महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे अधोगती पुस्तक सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. भगत सिंह कोश्यारी आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरुन निवृत्त होत असून त्यांना निरोप देण्यात आला. कोश्यारी हे महाराष्ट्राच्या इतिहासातले सर्वात चर्चित ठरलेले राज्यपाल ठरले आहेत. त्यांनी केलेल्या विविध वक्तव्यामुळं त्यांची जोरदार चर्चा झाली. अशात कोश्यारींनी दिलेला राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्ट शेयर करत जाता जाता कोश्यारींना डिवचलं आहे.
#BhagatSinghKoshyari #SharadPawar #AjitPawar #NCP #FacebookPost #SocialMedia #Maharashtra #Resignation #Rajyapal #Controversy #BJP #Shivsena #MahavikasAghadi